Ad will apear here
Next
‘सवर्णांना आरक्षण देणारा केंद्र सरकारचा निर्णय क्रांतिकारक’
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंकडून निर्णयाचे स्वागत
मुंबई : ‘दलित, आदिवासी, ओबीसी यांच्या आरक्षणाला धक्का न लावता आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना (ईबीसी) स्वतंत्र प्रवर्ग करून १० टक्के आरक्षण देणारा केंद्र सरकारचा निर्णय क्रांतिकारक ठरणारा आहे,’ अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या निर्णयाचे स्वागत केले.  

सवर्णांमधील आर्थिकदृष्ट्या मागासांना स्वतंत्र प्रवर्ग करून १० टक्के आरक्षण देणारा निर्णय घेऊन दलित सवर्ण यांच्यातील दरी मिटविण्यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलल्याबद्दल आठवले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे.

आठवले म्हणाले, ‘देशभरातील ब्राह्मण, मराठा, जाट, राजपूत, गुज्जर, पटेल, लिंगायत आदी सवर्ण समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासांना आर्थिक निकषावर स्वतंत्र प्रवर्ग करून आरक्षण देण्यात यावे; मात्र दलित, आदिवासी, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी आपण राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बैठकीत चार वेळा केली होती. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची भेट घेऊन ही मागणी केली होती. आज सात जानेवारीला झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपली मागणी मान्य झाली असून, आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना स्वतंत्र प्रवर्ग करून १० टक्के आरक्षण देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आपण या निर्णयाचे स्वागत करीत असून, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हा अभिनंदनीय निर्णय घेतला आहे.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZVKBW
Similar Posts
‘२०१९मध्येही भाजपच्याच नेतृत्वाखाली केंद्रात सत्ता’ मुंबई : ‘गेल्या चार वर्षांत देशातील सर्वात गरीब आणि सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने काम केल्याने २०१९मध्ये पुन्हा एकदा भाजपच्याच नेतृत्वाखाली केंद्रात सत्ता स्थापन होईल,’ असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला
‘मोदी सरकारच्या कामामुळे व नेतृत्वामुळे भाजपचा विजय’ मुंबई : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेले काम जनतेसमोर होते. या कामामुळे व मोदींच्या नेतृत्वामुळे भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीत जबरदस्त विजय मिळाला,’ असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे यांनी २३ मे रोजी केले. निवडणुकीत आशिर्वाद दिल्याबद्दल
‘केलेल्या कामांवर ‘एनडीए’ने ही निवडणूक जिंकली’ मुंबई : ‘प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावावर सन २०१४ची निवडणूक जिंकली; मात्र आता मोदींच्या नेतृत्वातील ‘एनडीए’ सरकारच्या कामावर २०१९ची ही निवडणूक आम्ही जिंकली आहे. नरेंद्र मोदींची हवा नाही म्हणणाऱ्या गांधी परिवाराचा करिष्मा देशातून संपला असून, जनतेच्या मनात मोदींची केवळ हवा नव्हती, तर तुफान होते
‘मुंबई सेंट्रल टर्मिनसला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या’ मुंबई : ‘भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस देण्यात यावे,’ अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. या मागणीसाठी लवकरच रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language